1) Books are for use. 2) Every reader his or her book. 3) Every book its reader. 4) Save the time of the reader. 5) The library is a growing organism.

Sunday, 10 December 2017

लायब्ररी ब्लॉग विषयी...


नमस्कार,
     सर्व विद्यार्थी, शिक्षकशिक्षकेतर घटक  समाजातील सूज्ञ, वाचनाची आवड असणारा सर्व ग्रंथप्रेमी परिवार आपणा सर्वाना या ब्लॉगच्या माध्यमातून भेटताना अतिशय आनंद होत आहे. आपण सर्वजण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ग्रंथ आणि ग्रंथालयाच एक अविभाज्य भाग आहोत किंबहुना असतो. त्यामुळे "समाजभूषण गणपतराव काळभोर कॉलेज (आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स), लोणी काळभोर (पुणे) महाराष्ट्र" येथील ग्रंथालया संदर्भात नव नवीन बाबी, उपक्रम आपणाला समजाव्यात यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न. सर्वाना ग्रंथालय आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून होणारे विविध प्रोग्राम आणि शैक्षणिक माहिती ही आहे त्या ठिकाणी आपणास मिळावी यासाठी हा ब्लॉग तयार केला आहे.

या ब्लॉगच्या माध्यमातून मी आपणास ऑडीओ बुक्स, ई-बुक्स, ई-ड्रामा, ई-न्यूजपेपर इ. अशा अनेक प्रकारच्या संसाधनांना आपल्या सर्वांच्या सोईसाठी उपलब्ध करून दिले आहे.

महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, स्टाफ यांना वारंवार लागणारी माहिती येथे उपलब्ध करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. या कामात मला मा. प्राचार्य सरांचे व महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांचे आणि माझे पती श्री. नंदकुमार साळुंके (ग्रंथपाल) यांचे विशेष सहकार्य लाभले, त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. 

आपल्या सर्वांच्या सूचनांचे नेहमीच स्वागत असेल...! 


एन. एन. हेमाडे (साळुंके
ग्रंथपाल व ग्रंथालय विभाग प्रमुख