Library Activities

 

1. Virtual Book Exhibition 2020-2021

हे आभासी ग्रंथ प्रदर्शन शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांच्या १०२ व्या (०९-०६-२०२१) जयंतीच्या निमित्ताने आयोजित केले आहे. या आभासी ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रंथ समीक्षा स्पर्धा आयोजित केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी खालील नियमांच्या आधीन राहून सहभाग नोंदवावा. 

आभासी ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ समीक्षा स्पर्धा

Virtual Book Exhibition and Competition of Books Criticism

महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब व ग्रंथालय सल्लागार समिती यांच्या मार्गदर्शनाने ग्रंथालय विभागामार्फत आपल्या कॉलेजचे 'आभासी ग्रंथ प्रदर्शन' व 'ग्रंथ समीक्षा स्पर्धा' आयोजित केलेली आहे. 


“महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ” यांच्या https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1/

या वेबसाईट लिंक मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली 444  दुर्मिळ पुस्तके/ग्रंथ पी.डी. एफ. स्वरूपामध्ये सर्वांसाठी मोफत खुले केलेले आहेत. आपण आपणास हवे ते ग्रंथ डाऊनलोड करू शकतो. या संकेत स्थळावर सर्व विषयावरील १९६० पासूनची अनेक दुर्मिळ व अभ्यासनिहाय ग्रंथ आहेत. यातील काही निवडक ग्रंथांचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आभासी ग्रंथप्रदर्शन व्हिडीओ (Virtual Book Exhibition) तयार केला आहे. "महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ" या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या 444 पुस्तकांपैकी कोणतेही एक पुस्तक निवडून त्याचे वाचन करून, समीक्षा लिहून तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल.

Virtual Book Exhibition 2020-2021 

👆

बघण्यासाठी येथे क्लिक करा 

ग्रंथ समीक्षा स्पर्धा

आपण सर्वांची वाचनाची आवड विचारात घेऊनच महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग व ग्रंथालय सल्लागार समिती व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवरती क्लिक करून फॉर्म भरावा. फॉर्म मध्ये दिलेल्या WhatsApp ग्रुप मध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.

स्पर्धेची अंतिम तारीख १५ जुलै २०२१ असेल, उशिरा येणाऱ्या समीक्षेचा विचार केला जाणार नाही.

स्पर्धेची नोंदणी लिंक: https://forms.gle/Sj8MzVGrhxJv1gnh9

स्पर्धेचे नियम

१. ही स्पर्धा LBS COLLEGE च्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये प्रवेशित असलेल्या UG व PG च्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. 

२. समीक्षा लिखाण करताना पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, स्वतःचे नाव, वर्ग, रोल नंबर या बाबी सुरुवातीलाच लिहिलेल्या असाव्यात. 

३. ग्रंथ समीक्षा एक ते दीड पानात हाताने लिहून किंवा टाईप केलेली असावी. 

४. आपले लिखाण स्वलिखित असावे (चौर्य केलेले नसावे). 

५. आपले लिखाण "LBS ग्रंथ समीक्षा स्पर्धा" या WhatsApp ग्रुप लिंकमध्ये पाठवून देणे आवश्यक आहे. 

६. प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिक देण्यात येत आहे. 

७. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.  


प्रा. हेमाडे एन. एन.

ग्रंथपाल, लाल बहादुर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँण्ड कॉमर्स सातारा.


प्रा. निनाद कदम

IQAC समन्वयक, लाल बहादुर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँण्ड कॉमर्स सातारा.


डॉ. शेजवळ आर. व्ही.

प्राचार्य, लाल बहादुर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँण्ड कॉमर्स सातारा.

No comments:

Post a Comment